के के वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कु.श्लोक ने घेतली गगनभरारी


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारीच्या
वतीने गुरुवार दिनांक 13 /8/2026 राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय जलतरण  स्पर्धेत के.के. वाघ सेकंडरी स्कुल व ज्युनिअर कॉलेज, सरस्वती नगरचा  इयत्ता दहावीचा विद्यार्थी कु. श्लोक  अविनाश कदम याने 50 मीटर व 100 मीटर स्पर्धेत  🥇 द्वितीय क्रमांक मिळविला आहे. श्लोक च्या या यशाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. समीर दादा वाघ, संस्थेचे सचिव मा. श्री. के. एस. बंदी सर, के. के. वाघ इंग्लिश स्कूल्स व कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक मा.डॉ. भूषण कर्डिले सर, के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. चित्रा नरवडे तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी श्लोक ला  पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले